हुंडा म्हटलं की माझी तळपायाची आग मस्तकात जाते. खरतर आपण कुठल्याही सामान्य व्यवहारात एखादी गोष्ट घेतली की त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. पण मग इथं असं कसं? की बाबा तुझी पोरगी तू आम्हाला दे आणि पैसेपण दे. आता तुम्ही म्हणाल काय राव लग्नं म्हणजे व्यवहार नाही. ते असतं २ मनांचं मिलन वगैरे वगैरे. पण आमचंही म्हणणं तेच आहे. हा जर व्यवहार नाही तर कशाला घेता तुम्ही पैसे. नका घेऊ ना. की माणसाला पाठीचा कणा असतो आणि तो नेहमी ताठ ठेवायचा असतो हे विसरून गेलायेत तुम्ही? मला प्रत्येक हुंडा घेणाऱ्याला जाऊन विचारावासं वाटतं, "कसं वाटतं तुम्हाला हुंडा मागताना?". कि लाज लज्जा शरम हे आपल्याला नावाला काय गावालाही माहित नाही? एखाद्याने भर चौकात तुमची विजार उतरवून तुम्हाला नागडं केलं आहे असं नाही वाटत तुम्हाला?
आजतागायत "हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला." अशी लोकगीतं प्रत्येकाच्या ओठी आणून कितीतरी जणांनी प्रयत्न केले हुंड्यासारखी वाईट प्रथा समाजाबाहेर काढण्याची पण सगळं व्यर्थ. मी काय दिवा लावणार आहे? हा पण हा लेख वाचून एक जरी तो उठून उभा राहिला आपल्या घरच्यांना समजून सांगितलं तरी खूप मिळेल मला. कसे रे पोरं तुम्ही आपल्याला काही मान आहे कि नाही? आपण सगळेच एवढंतरी निदान कमवत असतो की अजून एखादं माणूस घरात वाढलं तरी आपण सहज पोसू त्याला. का नाही आपण ठामपणे सांगत आपल्या घरच्यांना की तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालायला मी समर्थ आहे, हुंडा जर घेतलात तर मी लग्नच करणार नाही. मला तर अश्या मुलांची आणि त्यांच्या आईवडिलांची खूप कीव येते. आईला ला तर सारं काही माहित असतं तिने स्वतःच्या वडिलांचे हुंड्यासाठी पैसे जमवतानाचे हाल, त्यांची तगमग तिच्या डोळ्यांनी पाहिलेली असते. तरीपण स्वतःचा मुलगा लग्नाला उभा राहिला की यांचे हात शिवशिवतात हुंडा घ्यायला. मी मात्र या बाबतीत खूप नशीबवान आहे, माझ्या आधी माझी आईच मला म्हणाली आपण मुलीकडच्यांकडून काहीही घ्यायचं नाही. पर्वा माझ्या एका मित्राचा साखरपुडा झाला सगळं कसं अचानक ठरलं पण माझ्या या मित्राने आधीच आपल्या घरच्यांना सांगून ठेवलं होतं की हुंडा घ्यायचा नाही म्हणून. आणि त्याच्या घरच्यानीपण त्याचं ऐकलं. मला फार कौतक वाटतं अशा कुटुंबांचं.
मला अशा मुलींचं सुद्धा खूप वाईट वाटतं, की ज्या लग्नं ठरलं की स्वप्नात हरवून जातात. आपल्या बाबाला आपल्या भावाला काय काय करावं लागतंय आपल्या लग्नासाठी याची त्यांना खबरही नसते. अरे हे तुमचं लग्नं आहे! तुम्हाला माहीतच असलं पाहिजे ते कसं ठरतंय ते. तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही असा निर्णय का घेऊ शकत नाही, की जो मुलगा हुंडा मागतोय त्याच्याशी लग्नच करायचं नाही. असा निर्णय घेऊन जर आजच्या मुली उभा राहिल्या तर नक्कीच हि प्रथा लौकरच बंद होईल.
मित्रानो आणि मैत्रीणीनो तुम्हीच विचार करा. आपला होणारा नवरा किंव्हा होणारी बायको आपल्याला वाकलेल्या कण्याची चालेल काय? अहो एकदा तुम्ही ठाम निर्णय घेऊन उभं राहून तरी बघा, बघा आयुष्यभर तुमचा तुमच्या लाइफ़ पार्टनर ला अभिमान असेल तो कधीच तुमचा अपमान करणार नाही.

No comments:
Post a Comment