Wednesday 16 September 2020

सर्वव्यापी

तो सर्वव्यापी आहे असं म्हणतात. खरंच आहे का तसं? कधी कधी तसे अनुभव सुद्धा येतात. आणि मग विश्वास ठेवावा असं वाटतं. आता कालचीच गोष्ट पहा. मी आणि अक्षदा (माझी सौ), आम्ही दोघे दुचाकीवरून गावावरून येत होतो. सध्या कोरोनामुळे रस्ते एकदम मोकळे होते. आम्ही दोघे फार आनंदात होतो. पुढच्या आयुष्याची स्वप्नं रंगवत रंगवत येत होतो. त्या नादात आमच्या गाडीने ने कधी वेग घेतला आम्हाला कळलेच नाही. भिगवण च्या पुलाच्या उतारामुळे बहुतेक असावे,  गाडी ताशी ७० ते ७५ च्या वेगात असेल. अचानक बाजूच्या सर्विस रोड वरून एक गाडी इंडिकेटर न दाखवता आत शिरली. मी भानावर आलो आणि लगेच हॉर्न वाजवला. त्या गाडीचालकाने गाडी थांबवली आणि माझ्याकडे पाहून वेगळेच हसला. कोण होता तो? तसा का हसत होता ह्या विचारात न पडता मी त्याच्या पुढे जाऊन डाव्या बाजूने परत गाडी चालवू लागलो. अचानक परत तोच गाडीवाला आमच्या पुढे जाऊ पाहत होता. त्याला वाटही होतीच. तो जरासा पुढे गेला असेल आणि त्याच्या गाडीसमोर कुत्रं आलं. पांढऱ्या रंगाचं, बऱ्यापैकी उंची असणारं, जास्त पोसलेलही नव्हतं आणि जास्त कुपोषितही नव्हतं. पण त्या गाडीवाल्याने त्याचा वेग काही कमी केला नाही. पण ते त्याच्या गाडीला चुकवून माझ्या गाडीसमोर येऊन उभं राहिला आणि मी ही वेगाला आवरू शकलो नाही आणि पुढचं चाक धडकलं त्याला. काय वेदना झाल्या असतील बिचाऱ्याला? जीवच गेला त्याचा, आम्हीही पडलो. भानावर आलो तेंव्हा मी कोलांट्याउड्या खात खात पुढे फरपटत चाललो होतो. थांबलो तेंव्हा पाहिलं तर अक्षदा मागे पडली होती. तीसुद्धा बरेच लांब फरपटत गेली होती. गाडी एका बाजूला पडली होती. कुत्रा शेवटच्या घटका मोजत होतं. आणि तो गाडीवाला कधीच पुढे निघून गेला होता. आम्ही दोघे रक्तबंबाळ झालो होतो कपडे फाटले होते. कुत्रं तर मरुनच पडलं होतं. हृदय दुप्पट वेगाने धडधड करत होतं. नशिबाने मागे कुठली गाडी नव्हती नाहीतर आम्ही दोघेही ह्या .... . हे सगळं झाल्यावर लोकांनी आम्हाला दवाखान्यात नेलं. आमच्यावर उपचार झाले. आम्ही घरी पोचलो. आईने आमच्यावरून तुकडा ओवाळून टाकला. आणि म्हणाली कानावरून गेलं. कानावरून गेलं म्हणजे काय तर आपल्यावर आलेला मृत्यू दुसऱ्यावर जाणे. 

ह्या सगळ्याचा मी नंतर विचार करत बसलो होतो. कि आमच्या साठी आलेला काळ कुत्र्याला घेऊन गेला. कि कुत्र्यामुळेच सर्व झालं? तो माणूस कोण होता? आणि तो वेगळाच का हसला? तोच काळ होता का? मग जर तो काळ असेल तर त्या कुत्र्याचा मृत्यू माझ्याकडून का करवून घेतला? आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. मग ह्या सगळ्यामागे देवाची काय योजना असेल? काय चांगलं करायचं होतं त्याला? की जीव वाचला हेच चांगलं झालं होतं? माहित नाही. त्याच्या योजना तोच जाणे. आपण विचारही करू शकत नाही अस काहीतरी त्याला घडवून आणायचं असेल. आपण ह्याचा जास्त विचार करायचा नाही हे मी ठरवलंय आता. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याने आमच्यासाठी नक्कीच काहीतरी खूप चांगला प्लॅन करून ठेवलं असेल. तो सर्वव्यापी आहे हेच खरं. 


- कौस्तुभ एकबोटे


 

Friday 3 April 2015

Writer kaustubh: हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला.

Writer kaustubh: हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला.: हुंडा म्हटलं की माझी तळपायाची आग मस्तकात जाते. खरतर आपण कुठल्याही सामान्य व्यवहारात एखादी गोष्ट घेतली की त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात...

Thursday 2 April 2015

हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला.

हुंडा म्हटलं की माझी तळपायाची आग मस्तकात जाते. खरतर आपण कुठल्याही सामान्य व्यवहारात एखादी गोष्ट घेतली की त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात. पण मग इथं असं कसं? की बाबा तुझी पोरगी तू आम्हाला दे आणि पैसेपण दे. आता तुम्ही म्हणाल काय राव लग्नं म्हणजे व्यवहार नाही. ते असतं २ मनांचं मिलन वगैरे वगैरे. पण आमचंही म्हणणं तेच आहे. हा जर व्यवहार नाही तर कशाला घेता तुम्ही पैसे. नका घेऊ ना. की माणसाला पाठीचा कणा असतो आणि तो नेहमी ताठ ठेवायचा असतो हे विसरून गेलायेत तुम्ही? मला प्रत्येक हुंडा घेणाऱ्याला जाऊन विचारावासं वाटतं, "कसं वाटतं तुम्हाला हुंडा मागताना?". कि लाज लज्जा शरम हे आपल्याला नावाला काय गावालाही माहित नाही? एखाद्याने भर चौकात तुमची विजार उतरवून तुम्हाला नागडं केलं आहे असं नाही वाटत तुम्हाला?


आजतागायत "हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला." अशी लोकगीतं प्रत्येकाच्या ओठी आणून कितीतरी जणांनी प्रयत्न केले हुंड्यासारखी वाईट प्रथा समाजाबाहेर काढण्याची पण सगळं व्यर्थ. मी काय दिवा लावणार आहे? हा पण हा लेख वाचून एक जरी तो उठून उभा राहिला आपल्या घरच्यांना समजून सांगितलं तरी खूप मिळेल मला. कसे रे पोरं तुम्ही आपल्याला काही मान आहे कि नाही? आपण सगळेच एवढंतरी निदान कमवत असतो की अजून एखादं माणूस घरात वाढलं तरी आपण सहज पोसू त्याला. का नाही आपण ठामपणे सांगत आपल्या घरच्यांना की तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालायला मी समर्थ आहे, हुंडा जर घेतलात तर मी लग्नच करणार नाही. मला तर अश्या मुलांची आणि त्यांच्या आईवडिलांची खूप कीव येते. आईला ला तर सारं काही माहित असतं तिने स्वतःच्या वडिलांचे हुंड्यासाठी पैसे जमवतानाचे हाल, त्यांची तगमग तिच्या डोळ्यांनी पाहिलेली असते. तरीपण स्वतःचा मुलगा लग्नाला उभा राहिला की यांचे हात शिवशिवतात हुंडा घ्यायला.  मी मात्र या बाबतीत खूप नशीबवान आहे, माझ्या आधी माझी आईच मला म्हणाली आपण मुलीकडच्यांकडून काहीही घ्यायचं नाही. पर्वा माझ्या एका मित्राचा साखरपुडा झाला सगळं कसं अचानक ठरलं पण माझ्या या मित्राने आधीच आपल्या घरच्यांना सांगून ठेवलं होतं की हुंडा घ्यायचा नाही म्हणून. आणि त्याच्या घरच्यानीपण त्याचं ऐकलं. मला फार कौतक वाटतं अशा कुटुंबांचं.

मला अशा मुलींचं सुद्धा खूप वाईट वाटतं, की ज्या लग्नं ठरलं की स्वप्नात हरवून जातात. आपल्या बाबाला आपल्या भावाला काय काय करावं लागतंय आपल्या लग्नासाठी याची त्यांना खबरही नसते. अरे हे तुमचं लग्नं आहे!  तुम्हाला माहीतच असलं पाहिजे ते कसं ठरतंय ते. तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही असा निर्णय का घेऊ शकत नाही, की जो मुलगा हुंडा मागतोय त्याच्याशी लग्नच करायचं नाही. असा निर्णय घेऊन जर आजच्या मुली उभा राहिल्या तर नक्कीच हि प्रथा लौकरच बंद होईल.

मित्रानो आणि मैत्रीणीनो तुम्हीच विचार करा. आपला होणारा नवरा किंव्हा होणारी बायको आपल्याला वाकलेल्या कण्याची चालेल काय? अहो एकदा तुम्ही ठाम निर्णय घेऊन उभं राहून तरी बघा, बघा आयुष्यभर तुमचा तुमच्या लाइफ़ पार्टनर ला अभिमान असेल तो कधीच तुमचा अपमान करणार नाही. 

Tuesday 24 March 2015

Feeling satisfied

Feeling satisfied is equals to peace of mind. This equation really works. When you starts your day with the joyful morning, you have decided some tasks for the day in your mind. As day passes you are picking up tasks one by one and finishing them with no any rework, no any issues. As tasks are getting done you will feel empty. You feel more satisfied more peaceful. And when you are satisfied and peaceful you behave wisely and nicely with your family. You can be with them 100% . No anger,  no worries, no sorry can touch you. You have absolutely no guilt in your heart as you are giving full of you to your work to your family.

You do not have second thought in your mind. This state of your mind gives you peace. When you achieve this state, you started doing things perfectly like a champ. You just start it from zero and finish it. You know all the things. You have full idea about the work you are doing. You know what you are doing. You  have full plan ready in your mind before started working. Now you are started giving 100% of you to your work. When this happens you feel satisfied and peaceful.

Before you start your day. Make a list of all tasks for the day. Before doing any task, take your time, make a plan and start working. I know this is very hard to achieve but at least we can start from now. Don't know may be you can achieve this one day....

Sunday 1 March 2015

माणसाचं लहरी मन

माणसाचं लहरी मन आणि पाऊस यांची किती छान सांगड घालता येईल. कधी खूप बरसतं दुसऱ्याला खूप सुख देतं. पावसाचही तसंच असतं तापलेल्या धरतीला शांत करून जातो. दोन माणसांची मनं तेंव्हाच एकत्र येऊ शकतात जेंव्हा ती एकमेकांत गुंतलेली असतात अगदी उसाच्या गुऱ्हाळाच्या दोन काटेरी चाकांसारखी जेंव्हा ती गुंततात तेंव्हाच ती एकमेकांच्या साथीनं पुढे जातात.
माणसाच्या मनानं  आभळासारखं असावं सर्वांची दु:ख्खे भरून घ्यावीत अन मन भरून आलं म्हणजे मग पावसासारखं पडून मोकळं  व्हावं. धुळीनं माखलेलं  पान जसं पाऊस पडून गेल्यावर हिरवं कंच होतं अगदी तसंच किंवा नव्या वहीच्या पहिल्या कोऱ्या पानासारखं मनानं नवं व्हावं अन पुन्हा एकदा सर्वांची दु:खं समावण्यासाठी तयार व्हावं.

थोडं Holland विषयी part II

आज office वरून सुटल्यावर आम्ही सहजच म्हणून फिरायला बाहेर पडलो. आणि आम्ही अजून एकदाही न गेलेल्या दिशेने चालालायला लागलो. छान वारा सुटला होता. हवेतला गारठा जाणवत होता. झाडांच्या पानांची सळसळ ओळखीची वाटली म्हणून पाहिलं तर ओळखीचं झाड भेटलं. पिंपळाची झाडं जगात कुठंही भेटली तरी आपलीशी वाटतात आणि भारताची आपल्या मातीची आठवण देऊन जातात. एखाद्या चित्रकाराने आपल्या कुंचल्याने एखादे छानसे घर रेखाटावे जे खरच कधी अस्तित्वात असू शकते यावर कोणाचाच विश्वास बसू शकणार नाही एवढी सुंदर घरं आज मी पहिली. इथली मानसं एवढी मनापासून कामे करतात कि त्यांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर असते. well-finished असते. इथली मानसं खूप रसिक आहेत. प्रत्येक घराच्या भोवती फुलझाडे दिसतील. धूळ अजिबात नसल्याने सगळंच खूप स्वच्छ असतं अगदी घराची कौलही अगदी नवी असल्यासारखी वाटतात. आम्ही एक घर पाहिलं एवढ सुदर ठेवलं होतं त्या माणसाने कि मी ते शब्दात सांगू एकात नाही. घराच्या भोवताली वेगवेगळ्या रंगांची फुलझाडे होती. घराच्या बाजूला शेत होतं. घराच्या अंगणात लावलेली झाडे सुद्धा अगदी नक्षीदार रीतीने लावलेली होती. खूप मस्त वाटलं. That was a memorable evening walk through the Veghel.

थोडं Holland विषयी

मला अजून इथे येउन जरी जास्त दिवस झालेले नसले आणि इथल्या लोकांशी एवढं interaction झालेलं नसलं तरी इथल्या लोकांबद्दल काही ठळक अनुमान लावता येतिल.
इथले लोक मला खूप particular वाटले. ते नियमांना खूप महत्व देतात. सगळेच नियम पाळत असल्यामुळे सगळं शांततेत चाललेलं असतं. ही लोकं technology वर एवढे depend आहेत कि machine मध्ये काही बिघाड झाला कि यांचं कामच थांबतं. त्यांच्याकडे दुसरा मार्गाच नसतो. पण त्या बाबतीत आपल्या भारतीयांचा डोकं खूप चालत याचा फार अभिमान वाटला. आपण काही न काही कामचलाउ मार्ग काढतोच. पण त्यांच्या इथे खूप कमी वेळा असा बिघाड होतो हेही तितकाच खरं. तिथले सगळेच लोक नीटनेटके असतात. कपड्यांना हे लोक फार महत्व देतात. रस्त्याने जाणारा प्रत्येक जन ज्याच्याशी आपली नजर मिळेल तो प्रत्येकजण आपल्याला hi / hello करूनच पुढे जतो. thank you, sorry हे शब्दं खिरापत वाटल्यासारखे वाटले जात नाहीत. इथे आल्यापासून मी एवढ्या गाड्या पहिल्या पण एकही गाडीचा होर्न ऐकू नाही आला. इथे जर तुमच्यासाठी होर्न वाजवला गेला तर तो insult समजला जतो. इथले रस्ते, इथला परिसर खूप छान आहे स्वछ आहे. ट्राफिक कंट्रोल priority वर केलं जातं. चालणार्याला पहिली priority. cycles साठी वेगळे tracks केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचा वापर होतो. प्रत्येकाच्या गाडीला मागे trolly अडकवण्यासाठी angle आहे. कधी कधी ह्या trolly वर cycles लाऊन यांचा प्रवास चालू आसतो. जवळ जाण्यासारख्या ठिकाणी cycles चाच वापर केला जतो. कितीही म्हातारा माणूस असला तरीही तो cycle वापरतो ज्यांना चालता येत नाही अशा लोकांसाठी त्यांच्या कडे electronics wheel chairs आहेत.  एकूणच सगळं अलबेल आहे असा म्हणायला हरकत नाही.अजून थोडा interaction झालं कि अजून लिहीन.

आता थोडं हवामानाबाबत, आपल्या इथे जेवढी light fluctuate होते तेवढं इथे तापमान fluctuate होतं. आज सकाळी ८ अंश c होतं आणि संध्याकाळ पर्यंत शेवटचा तापमान पाहिला तेंव्हा ते १७ च्या आसपास होतं. कधी कधी सकाळी धुकं असतं. कधी एकदम clear. मी वरती म्हटला तसं त्यांचा technology वर एवढा विश्वास आहे कि त्यांचे plans हवामान खात्याच्या अनुमानावर fix होतात. पण इथे सगळीकडे हिरवागार गार आहे. खूप सारी शेतं आहेत, मुबलक पशुधन आहे. इथला शेतकरी आधुनिक हत्यारांनी सज्ज आहे आणि म्हणूनच सधनही आहे.

आपलाही शेतकरी आसाच सधन व्हावा सुखी व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.