Tuesday, 24 March 2015

Feeling satisfied

Feeling satisfied is equals to peace of mind. This equation really works. When you starts your day with the joyful morning, you have decided some tasks for the day in your mind. As day passes you are picking up tasks one by one and finishing them with no any rework, no any issues. As tasks are getting done you will feel empty. You feel more satisfied more peaceful. And when you are satisfied and peaceful you behave wisely and nicely with your family. You can be with them 100% . No anger,  no worries, no sorry can touch you. You have absolutely no guilt in your heart as you are giving full of you to your work to your family.

You do not have second thought in your mind. This state of your mind gives you peace. When you achieve this state, you started doing things perfectly like a champ. You just start it from zero and finish it. You know all the things. You have full idea about the work you are doing. You know what you are doing. You  have full plan ready in your mind before started working. Now you are started giving 100% of you to your work. When this happens you feel satisfied and peaceful.

Before you start your day. Make a list of all tasks for the day. Before doing any task, take your time, make a plan and start working. I know this is very hard to achieve but at least we can start from now. Don't know may be you can achieve this one day....

Sunday, 1 March 2015

माणसाचं लहरी मन

माणसाचं लहरी मन आणि पाऊस यांची किती छान सांगड घालता येईल. कधी खूप बरसतं दुसऱ्याला खूप सुख देतं. पावसाचही तसंच असतं तापलेल्या धरतीला शांत करून जातो. दोन माणसांची मनं तेंव्हाच एकत्र येऊ शकतात जेंव्हा ती एकमेकांत गुंतलेली असतात अगदी उसाच्या गुऱ्हाळाच्या दोन काटेरी चाकांसारखी जेंव्हा ती गुंततात तेंव्हाच ती एकमेकांच्या साथीनं पुढे जातात.
माणसाच्या मनानं  आभळासारखं असावं सर्वांची दु:ख्खे भरून घ्यावीत अन मन भरून आलं म्हणजे मग पावसासारखं पडून मोकळं  व्हावं. धुळीनं माखलेलं  पान जसं पाऊस पडून गेल्यावर हिरवं कंच होतं अगदी तसंच किंवा नव्या वहीच्या पहिल्या कोऱ्या पानासारखं मनानं नवं व्हावं अन पुन्हा एकदा सर्वांची दु:खं समावण्यासाठी तयार व्हावं.

थोडं Holland विषयी part II

आज office वरून सुटल्यावर आम्ही सहजच म्हणून फिरायला बाहेर पडलो. आणि आम्ही अजून एकदाही न गेलेल्या दिशेने चालालायला लागलो. छान वारा सुटला होता. हवेतला गारठा जाणवत होता. झाडांच्या पानांची सळसळ ओळखीची वाटली म्हणून पाहिलं तर ओळखीचं झाड भेटलं. पिंपळाची झाडं जगात कुठंही भेटली तरी आपलीशी वाटतात आणि भारताची आपल्या मातीची आठवण देऊन जातात. एखाद्या चित्रकाराने आपल्या कुंचल्याने एखादे छानसे घर रेखाटावे जे खरच कधी अस्तित्वात असू शकते यावर कोणाचाच विश्वास बसू शकणार नाही एवढी सुंदर घरं आज मी पहिली. इथली मानसं एवढी मनापासून कामे करतात कि त्यांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर असते. well-finished असते. इथली मानसं खूप रसिक आहेत. प्रत्येक घराच्या भोवती फुलझाडे दिसतील. धूळ अजिबात नसल्याने सगळंच खूप स्वच्छ असतं अगदी घराची कौलही अगदी नवी असल्यासारखी वाटतात. आम्ही एक घर पाहिलं एवढ सुदर ठेवलं होतं त्या माणसाने कि मी ते शब्दात सांगू एकात नाही. घराच्या भोवताली वेगवेगळ्या रंगांची फुलझाडे होती. घराच्या बाजूला शेत होतं. घराच्या अंगणात लावलेली झाडे सुद्धा अगदी नक्षीदार रीतीने लावलेली होती. खूप मस्त वाटलं. That was a memorable evening walk through the Veghel.

थोडं Holland विषयी

मला अजून इथे येउन जरी जास्त दिवस झालेले नसले आणि इथल्या लोकांशी एवढं interaction झालेलं नसलं तरी इथल्या लोकांबद्दल काही ठळक अनुमान लावता येतिल.
इथले लोक मला खूप particular वाटले. ते नियमांना खूप महत्व देतात. सगळेच नियम पाळत असल्यामुळे सगळं शांततेत चाललेलं असतं. ही लोकं technology वर एवढे depend आहेत कि machine मध्ये काही बिघाड झाला कि यांचं कामच थांबतं. त्यांच्याकडे दुसरा मार्गाच नसतो. पण त्या बाबतीत आपल्या भारतीयांचा डोकं खूप चालत याचा फार अभिमान वाटला. आपण काही न काही कामचलाउ मार्ग काढतोच. पण त्यांच्या इथे खूप कमी वेळा असा बिघाड होतो हेही तितकाच खरं. तिथले सगळेच लोक नीटनेटके असतात. कपड्यांना हे लोक फार महत्व देतात. रस्त्याने जाणारा प्रत्येक जन ज्याच्याशी आपली नजर मिळेल तो प्रत्येकजण आपल्याला hi / hello करूनच पुढे जतो. thank you, sorry हे शब्दं खिरापत वाटल्यासारखे वाटले जात नाहीत. इथे आल्यापासून मी एवढ्या गाड्या पहिल्या पण एकही गाडीचा होर्न ऐकू नाही आला. इथे जर तुमच्यासाठी होर्न वाजवला गेला तर तो insult समजला जतो. इथले रस्ते, इथला परिसर खूप छान आहे स्वछ आहे. ट्राफिक कंट्रोल priority वर केलं जातं. चालणार्याला पहिली priority. cycles साठी वेगळे tracks केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचा वापर होतो. प्रत्येकाच्या गाडीला मागे trolly अडकवण्यासाठी angle आहे. कधी कधी ह्या trolly वर cycles लाऊन यांचा प्रवास चालू आसतो. जवळ जाण्यासारख्या ठिकाणी cycles चाच वापर केला जतो. कितीही म्हातारा माणूस असला तरीही तो cycle वापरतो ज्यांना चालता येत नाही अशा लोकांसाठी त्यांच्या कडे electronics wheel chairs आहेत.  एकूणच सगळं अलबेल आहे असा म्हणायला हरकत नाही.अजून थोडा interaction झालं कि अजून लिहीन.

आता थोडं हवामानाबाबत, आपल्या इथे जेवढी light fluctuate होते तेवढं इथे तापमान fluctuate होतं. आज सकाळी ८ अंश c होतं आणि संध्याकाळ पर्यंत शेवटचा तापमान पाहिला तेंव्हा ते १७ च्या आसपास होतं. कधी कधी सकाळी धुकं असतं. कधी एकदम clear. मी वरती म्हटला तसं त्यांचा technology वर एवढा विश्वास आहे कि त्यांचे plans हवामान खात्याच्या अनुमानावर fix होतात. पण इथे सगळीकडे हिरवागार गार आहे. खूप सारी शेतं आहेत, मुबलक पशुधन आहे. इथला शेतकरी आधुनिक हत्यारांनी सज्ज आहे आणि म्हणूनच सधनही आहे.

आपलाही शेतकरी आसाच सधन व्हावा सुखी व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

माझा पहिलाच विमान प्रवास. (Mumbai - paris - Amsterdam)

हा माझा पहिलाच विमान प्रवास. मला खूप इच्छा होती पृथ्वीला वरून बघायची. रात्री २ ला आमच्या  विमानाने जेंव्हा वेग घेतला तेंव्हा सगळ्यांच्या अनुभव ऐकून मलाही असा वाटला होता कि माझ्याही पोटात गोळा येईल म्हणून पण एवढ स्मूथ टेक ऑफ घेतला विमानाने की कधी आम्ही जमिनीचा टच सोडला ते कळलाच नहि. रात्री मी जेंव्हा खिडकीतून बाहेर पाहिलं तेंव्हा मला असा वाटलं कि विमान एखाद्या बर्फाळ प्रदेश्वरून चाललंय आकाश निरभ्र फक्त पूर्ण चंद्र आणि बोटावर मोजण्या इतक्या चांदण्या, विमानाच्या पंख्यांचा आवाज असून सुद्धा मला एवढं शांत वाटत होतं कि मला माझ्या गावच्या चांदण्या रात्रीची आठवण आली. थोड्या वेळाने त्या बर्फाळ प्रदेशात एक काळा खड्डा दिसला. आणि पुढच्या खड्ड्यात रत्नांची खान असल्यासारखी वाटली. तेंव्हा मला कळलं कि आपण ढगांच्याही वरती आहोत. आणि हा जो बर्फाळ प्रदेश आपण समजत होतो तो बर्फाळ प्रदेश नसून तो ढगांचा थर आहे. आणि ती रत्नाची खान म्हणजे पृथ्वीवरचा  कुठलंस शहर असेल. सकाळी जेंव्हा सुर्य उगवला तो क्षणही अविस्मरणीय होता. सकाळी जेंव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं तेंव्हा सगळे ढग म्हणजे एखाद्याने खूप सारा कापूस पिंजून नीट साफ करून निवडून ठेवलाय असा वाटत होत. आपण जे ढगात प्राण्यांचे आकार बघतो ते सारे प्राणी जवळून पहिले. खरच खूपच मस्त होता माझा पहिला विमान प्रवास.