हा माझा पहिलाच विमान प्रवास. मला खूप इच्छा होती पृथ्वीला वरून बघायची.
रात्री २ ला आमच्या विमानाने जेंव्हा वेग घेतला तेंव्हा सगळ्यांच्या
अनुभव ऐकून मलाही असा वाटला होता कि माझ्याही पोटात गोळा येईल म्हणून पण
एवढ स्मूथ टेक ऑफ घेतला विमानाने की कधी आम्ही जमिनीचा टच सोडला ते कळलाच
नहि. रात्री मी जेंव्हा खिडकीतून बाहेर पाहिलं तेंव्हा मला असा वाटलं कि
विमान एखाद्या बर्फाळ प्रदेश्वरून चाललंय आकाश निरभ्र फक्त पूर्ण चंद्र
आणि बोटावर मोजण्या इतक्या चांदण्या, विमानाच्या पंख्यांचा आवाज असून
सुद्धा मला एवढं शांत वाटत होतं कि मला माझ्या गावच्या चांदण्या रात्रीची
आठवण आली. थोड्या वेळाने त्या बर्फाळ प्रदेशात एक काळा खड्डा दिसला. आणि
पुढच्या खड्ड्यात रत्नांची खान असल्यासारखी वाटली. तेंव्हा मला कळलं कि
आपण ढगांच्याही वरती आहोत. आणि हा जो बर्फाळ प्रदेश आपण समजत होतो तो
बर्फाळ प्रदेश नसून तो ढगांचा थर आहे. आणि ती रत्नाची खान म्हणजे
पृथ्वीवरचा कुठलंस शहर असेल. सकाळी जेंव्हा सुर्य उगवला तो क्षणही
अविस्मरणीय होता. सकाळी जेंव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं तेंव्हा सगळे ढग
म्हणजे एखाद्याने खूप सारा कापूस पिंजून नीट साफ करून निवडून ठेवलाय असा
वाटत होत. आपण जे ढगात प्राण्यांचे आकार बघतो ते सारे प्राणी जवळून पहिले.
खरच खूपच मस्त होता माझा पहिला विमान प्रवास.
No comments:
Post a Comment