आज office वरून सुटल्यावर आम्ही सहजच म्हणून फिरायला बाहेर पडलो. आणि आम्ही
अजून एकदाही न गेलेल्या दिशेने चालालायला लागलो. छान वारा सुटला होता.
हवेतला गारठा जाणवत होता. झाडांच्या पानांची सळसळ ओळखीची वाटली म्हणून
पाहिलं तर ओळखीचं झाड भेटलं. पिंपळाची झाडं जगात कुठंही भेटली तरी आपलीशी
वाटतात आणि भारताची आपल्या मातीची आठवण देऊन जातात. एखाद्या चित्रकाराने आपल्या
कुंचल्याने एखादे छानसे घर रेखाटावे जे खरच कधी अस्तित्वात असू शकते यावर
कोणाचाच विश्वास बसू शकणार नाही एवढी सुंदर घरं आज मी पहिली. इथली मानसं
एवढी मनापासून कामे करतात कि त्यांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट खूप सुंदर
असते. well-finished असते. इथली मानसं खूप रसिक आहेत. प्रत्येक घराच्या
भोवती फुलझाडे दिसतील. धूळ अजिबात नसल्याने सगळंच खूप स्वच्छ असतं अगदी
घराची कौलही अगदी नवी असल्यासारखी वाटतात. आम्ही एक घर पाहिलं एवढ सुदर
ठेवलं होतं त्या माणसाने कि मी ते शब्दात सांगू एकात नाही. घराच्या भोवताली
वेगवेगळ्या रंगांची फुलझाडे होती. घराच्या बाजूला शेत होतं. घराच्या
अंगणात लावलेली झाडे सुद्धा अगदी नक्षीदार रीतीने लावलेली होती. खूप मस्त
वाटलं. That was a memorable evening walk through the Veghel.
No comments:
Post a Comment